Friday, October 30, 2026
HomeGadchiroliपंकज गुड्डेवार यांच्या नियुक्तीने काँग्रेस संघटनेत नव्या पर्वाची सुरुवात...

पंकज गुड्डेवार यांच्या नियुक्तीने काँग्रेस संघटनेत नव्या पर्वाची सुरुवात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी भेट घेऊन केले अभिनंदन, पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा,

गडचिरोली, 30 ऑक्टोबर 2026::-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकजभाऊ गुड्डेवार यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी पंकज गुड्डेवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन गुड्डेवार यांचे अभिनंदन केले तसेच प्रभारी जिल्हाध्यक्षपदाच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस संघटनेची ताकद वाढविणे, युवकांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क अधिक दृढ करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना संघटनात्मक पातळीवर आवाज देणे, अशा विविध बाबींना आगामी काळात महत्त्व प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुड्डेवार यांच्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून, NSUI च्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्ष संघटनेसोबत समन्वय राखण्याची गरज असल्याचेही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून अधोरेखित झाले.

पंकज गुड्डेवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेच्या कामकाजाला नवी दिशा मिळावी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढावा आणि संघटनात्मक उपक्रमांना अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, सूरज थोराक, महेंद्र लटारे यांच्यासह काँग्रेस व NSUI चे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी पंकज गुड्डेवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular