VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुर झालेल्या जागेवरच बांधकाम सुरु केल्यास बांधकाम वेळेवर पूर्णत्वास जाणार अन्यथा बांधकाम रखडणार असल्याच्या वस्तुस्थितीची करून दिली माहिती,
मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जमिनीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे केले आश्वस्त,
गडचिरोली, ०५ ऑगस्ट २०२५::- गडचिरोली जिल्ह्याच्या दर्जेदार अशा आरोग्यसुविधेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरणार आहे. महायुती सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेत सुधारणा व्हावी गोरगरिब सर्वसामान्य नागरिकांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा व उपचार मिळावे यासाठी शासकिय वैद्यकिय महविद्यालय मंजुर केले. यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांचा पाठपुरावा व प्रयत्न सर्वश्रुत आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या महविद्यालय इमारत, रुग्णालय इमारत, वस्तीगृह व इतर बांधकामासाठी 71.41 एकर जमिन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या नावे करण्यात आली व या साठी 471.41 कोटी रुपये मंजुर करण्यात आले.

71.41 एकर जागेपैकी 27.61 एकर जागेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व टी बी रुग्णालय कार्यान्वित असून 43.80 एकर जागा वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय बांधकाम करण्याकरीता उपलब्ध आहे. हे बांधकाम करण्याकरीता ब्रीज अँड रूफ आर्कीटेक कडून वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, वस्तीगृह व निवासी इमारतीचे नकाशे तयार करण्यात आले व त्यास महाविद्यालय परिषदेने मंजुरीही दिली.यासाठी विविध प्रकारच्या संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा संस्थेस मिळाले आणि बांधकामासाठी 471.41 कोटी रुपयांचा निधीही मंजुर झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेपासून तर निधी पर्यंत सर्व कामे सुरळीत होत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अधिनस्त येत असलेल्या कृषी कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्राकडून 71.41 एकरपैकी जी 37.06 एकर जागा घेण्यात आली ती जागा सहपालक मंत्र्याच्या बैठकीत कृषी विज्ञान व प्रशिक्षण केंद्रास परत करण्याचें निर्देश देण्यात आले व त्या ऐवजी वनविभागाची 11.11 एकर जागा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास देण्याचे प्रस्तावित करण्यात आले.
मात्र वनविभागाची जागा वैद्यकिय महाविद्यालयाच्या संस्थेस मिळण्यात बऱ्याच अडचणी आहेत वनविभागाच्या जागेत अप्रोच रोड नाही तसेच वनविभागाची जागा सदर संस्थेस मिळण्यास बराच विलंब लागू शकतो, सदर जागेवर बांधकाम करण्यासाठीं पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणे कठीण आहे.PMC ने तयार केलेल्या प्लॅन नुसार महाविद्यालय, रुग्णालय, वस्तीगृह इमारत बांधकाम करण्यास किमान 18 हेक्टर जागेची आवश्यकता आहे.
37 एकर जागा परत केल्यामुळे वैद्यकिय महविद्यालयाच्या ईमारत व ईतर निवासी बंधकामाकरिता केवळ 6 एकर जागा उरते ही जागा तर ईमारत बांधकामास अपुरी पडते त्यात प्रस्तावित वनविभागाची जागा संस्थेस मिळण्यात खुप साऱ्या अडचणी आहेत आणि याबद्दलचा अहवाल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिषदेने दिला असतानाही 37.06 एकर जागा कृषी विज्ञान केंद्रास परत देण्याचा अट्टाहास का करण्यात आला हे न समजणारे कोडे आहे.
यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम रखडले असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी दिनांक 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला नागपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व जिल्हयातील आरोग्यसुविधेचा अभाव लक्षात घेता वैद्यकिय महविद्यालय तातडीने पूर्ण होणे कसे गरजेचे आहे, कृषी विज्ञान केंद्रास जमिन परत करण्याच्या निर्देशाने जागेची झालेली अडचण, बांधकामाचे नकाशे याबाबतची सविस्तर माहिती देवून वस्तुस्थितीची माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्रास परत करण्याचे दिलेले निर्देश स्थगित करून ती जागा पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परत देण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ईमारत बांधकामाचे नकाशे, जागेची माहिती जाणून घेतली व सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात मी राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याशी चर्चा करून यातुन मार्ग काढणार असे डॉ. देवराव होळी यांना आश्वस्त केले.
