VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो ) दिल्ली जिल्हा गडचिरोली तालुका शाखा घोट, चलो नवेगाव घोट रोड ,……चलो नवेगाव चलो नवेगाव घोट रोड……..
गडचिरोली/Chamorshi, ०८ सप्टेंबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रस्ते नवीनीकरण करणे तसेच घोट भागातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने लक्ष द्यावे गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष वेधावे यासाठी (विराट जन आक्रोश आंदोलन ) आंदोलनाचे नेतृत्व डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना डॉ, भारत खटी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रमुख वक्ता..माननीय प्रकाश भाऊ गेडाम राष्ट्रीय सल्लागार राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,
आंदोलनातील प्रमुख मागण्या:-
१) घोट रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय झाली पाहिजे,
२) अतिक्रमण जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले पाहिजे,
३) घोट तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे,
४) साखरदेव देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे,
५) मुतनूर व कोठरी पर्यटन स्थळाचा विकास करणे
६) घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, या करिता शासनाने घोट भागात उद्योग उभरावे,
७) चामोर्शी मूल मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे,
८) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विविध रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे,
९) पोहर नदी वरील पुलिया जवळ रस्ता दुरुस्ती करणे,

१०) सुरजागड व कोणसरी येथील लॉयड मेटल कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे,
११) दिना धरणाची उंची वाढवणे व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाची खोलीकरण करणे,
१२) चामोर्शी तालुक्यात दारूबंदी हा विषय कडक करणे,
१३) मछली चापलवाडा बस सुरू करणे,
१४) घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे,
१५) दिना धरन परिसर सौंदर्यीकरण करणे,
१६) घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे,
१७) चामोर्शी येथे एमआयडीसी निर्माण करणे,
१८) घोट मार्ग ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता तात्काळ दुरुस्त करणे,व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करणे व राज्य शासनाने घोट क्षेत्रातील विविध समस्या कडे लक्ष दयावे याकरिता विराट जनआंदोलन दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला आयोजित करण्यात आले आहे.

तरी घोट परिसरातील हजारो नागरिकांनी या जनआंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे ही विनंती,
आपले विनीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली तालुका चामोर्शी शाखा घोट,
