VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
महेश केदारी यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त,
गडचिरोली, 05 ऑक्टोबर 2026::-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गडचिरोली शहरातील विविध पक्षांशी संबंधित युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकसभा संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली शहरातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच विविध राजकीय पक्षांशी संबंधित युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठविणारी भूमिका, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि पक्षाची जनहिताची विचारधारा यामुळे आपण पक्षात सहभागी होत असल्याचे नव्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी अमोल कुळमेथे, तुषार मडावी, महंमद शेख, आदिल शेख, तिवारीलाल भोयर, पंकज बांनबले, अमन मुन्घाटे, अपूर्व मडावी, गौरव हरणे, गौरव लोणबले, अभिषेक चन्नवार, दयेश मोहुरले, सूरज लेनगुरे, भार्गव मांदाळे, सुशांत सोनुले, सुमित लोनबले, दीपांशू डोमळे, साहिल लेनगुरे, नंदकिशोर लेनगुरे, रितिक वाढई, योगीराज सहारे, राकेश सहारे, गणेश गुरुनुले, साहिल मडावी, अमित उसेंडी, शुभम मोहुरले, अमर ठाकरे आणि कैलास आदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
या नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे गडचिरोली शहरातील पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळणार असून, युवकांच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यास अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला लोकसभा संपर्क प्रमुख महेश केदारी, सहसंपर्क प्रमुख, संघटक, जिल्हाध्यक्ष पवन गेडाम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व युवकांचे पक्षाच्या वतीने स्वागत करून त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
