Sunday, October 4, 2026
HomeChamorshiतालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत डिस्नेलँड-प्रेसिडेन्सी स्कूलचा डंका...

तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत डिस्नेलँड-प्रेसिडेन्सी स्कूलचा डंका…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

१७ वर्षांखालील मुलांच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड,

गडचिरोली /चामोर्शी, 04 ऑक्टोबर 2026::-डिस्नेलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूल, चामोर्शी येथील १७ वर्षांखालील मुलांच्या बॅडमिंटन संघाने तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार विजयामुळे संघाची आगामी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत शाळेच्या संघातील प्रज्योत मेडी, कार्तिक मिस्त्री, दीक्षित पट्टेमवार, स्तवन भोयर आणि सोहम पोटवार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, कौशल्यपूर्ण खेळ आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

तालुकास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे डिस्नेलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.

यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक श्रीधर रोक्कला, प्रशिक्षक प्रणय बरसागडे, तालुका क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक राकेश खेवले तसेच शाळेचे प्राचार्य जे. विलास उपस्थित होते. त्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाने चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular