VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
शालेय विद्यार्थी, तथा विद्यार्थीनि तथा पोलिसांचा मोठया प्रमाणात बंदोबस्त,
गडचिरोली/ चामोर्शी, ०८ सप्टेंबर ::- गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा चामोर्शी – हरणघाट – मूल मार्ग सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून मोठ मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करून जीव मुठीत घेऊन दैनंदिन प्रवास करावा लागत आहे. दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांना व प्रवाशांना या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका कायम स्वरूपात निर्माण झाला आहे.
महत्वाच म्हणजे:-
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही व त्यामुळे अनेक अपघात घडले असून, नागरिकांचे प्राण सुद्धा गेले आहेत. तसेच बस मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राण धोक्यात आलेला आहे. मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांच्या वाहतूक सोयीसाठी असलेले रस्तेच आज जीवघेणे ठरत असेल तर ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.
याची गंभीर दखल घेत आज आजाद समाज पार्टी, भारतीय काँग्रेस कमिटी तालुका पदाधिकारी व युवा संकल्प यांनी आज दिनांक 8 सप्टेबर रोजी मूल, हरणघाट मार्गावरील भेंडाला येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस निरीक्षक चमोर्शी, तथा कृषी विभाग चामोर्शीचे पदाअधिकारी उपस्थीत होते.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, राहुल वैरागडे,प्रकाश बन्सोड, सोनू वाळके, देवानंद बोरकर, भाऊराव खोब्रागडे, महेश डांगे, तथा शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थितीत होते.
ग्रामस्थांच्या संगणमताने ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 11 वाजता या मार्गावर “चक्काजाम आंदोलन” छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता:-
प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त केल्यास होणारे अपघात, नागरिकांची हालअपेष्टा आणि संभाव्य जीवितहानी टाळता येईल. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आजाद समाज पार्टी काँग्रेस तालुका पदाधिकारी तथा युवा संकल्प पदाधिकारी यांची प्रमूख उपस्थिती होती.
