Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्ह्यातून शेकडो शेतकरी सरपंच उपसरपंच बांधव व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे 50...

गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो शेतकरी सरपंच उपसरपंच बांधव व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे 50 पदाधिकारी नाम फाउंडेशनच्या पुणे येथील दशकपूर्ती सोहळ्यात उपस्थित राहणार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नाम फाउंडेशन च्या दशकपूर्ती सोहळ्यात जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,

उद्या 13 सप्टेंबर ला जिल्ह्यातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते पुणे येथे रवाना होणार,

डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,

गडचिरोली , १२ सप्टेंबर २०२५::- गडचिरोलीजागर नामचा दशकपूर्ती सोहळा “जे जे जगी जगी जगते तया, माझे म्हणा, करुणा करा”या भावनेशी प्रामाणिक राहून सप्टेंबर 2015 साली नाम फाउंडेशन ची स्थापना झाली आणि आज फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे.

या वाटचालीस अनेक सबळ हाताने माणुसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले हा मानवतेचा यज्ञ असाच अखंडपणे चालत राहील यासाठी नाम फाउंडेशन कटिबद्ध आहे दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दशकपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी सोहळ्याचे निमंत्रण गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ, मिलिंद भाऊ नरोटे, मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली.मा.जिल्हा पोलीस अधीक्षक, माननीय उपजिल्हाधिकारी व माननीय जिल्हा नियोजन अधिकारी व गडचिरोली.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.गडचिरोली यांना आदरपूर्वक निमंत्रण दिले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांनी सांगितले या दशकपूर्ती सोहळ्याकरिता उद्या दिनांक 13 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे 50 पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व सरपंच, उपसरपंच कार्यकर्ते पुणे येथे रवाना होणार आहेत, या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री (भारत सरकार) माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य) माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माननीय उदयजी सामंत, उद्योग मराठी भाषा मंत्री (महाराष्ट्र राज्य) माननीय चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (महाराष्ट्र राज्य) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात आयोजक श्री नाना पाटेकर संस्थापक अध्यक्ष नाम फाउंडेशन पुणे,श्री मकरंद अनासपुरे संस्थापक सेक्रेटरी नाम फाउंडेशन पुणे,प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तरी जिल्ह्यातील शेतकरी, सरपंच उपसरपंच व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित रहावे.

असे आवाहन नाम फाउंडेशनच्या वतीने नाम फाउंडेशन चे श्री गायकवाड साहेब व श्री उमेश पाटील साहेब यांनी केले आले आहे नाम फाउंडेशनच्या वतीने निमंत्रण देताना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.श्री प्रणय खुणे, प्रदेश पदाधिकारी तथा मा.सिनेट सदस्य,रा.तु.म.नागपुर विद्यापीठ श्री प्रकाश गेडाम, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश अधिकारी, जिल्हा सचिव श्री प्रकाश थुल व पदाधिकारी उपस्थित होते,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular