Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliभव्य मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ,, महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा...

भव्य मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ,, महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १३ सप्टेंबर २०२५::- घर बांधकाम कंत्राटदार संघटना, गडचिरोली यांच्या वतीने कंत्राटदार, मिस्त्री व कामगार यांच्या परिश्रमातून साकारलेली प्रत्येक कामगारप्राप्ती प्रोत्साहन आणि त्यांच्या सुरक्षिततेकरीता विविध कल्याणकारी योजनाची माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी भव्य मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ यमुना लॉन, गडचिरोली येथे पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी उपस्थित राहून कंत्राटदार, कामगार, मिस्त्री व मजूर बांधवांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी आपल्या भाषणात महेंद्र भाऊ यांनी बांधकाम क्षेत्रात अहोरात्र घाम गाळणाऱ्या मजूर व मिस्त्री बांधवांचे मनापासून कौतुक केले. समाजाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वर्गाचे योगदान अमूल्य असून, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये यासाठी संघटना नेहमीच लढा देत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगार व कंत्राटदारांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती मिळावी, त्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती जाणीव निर्माण व्हावी आणि कामगारांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळावे यासाठी अशा प्रकारचे मार्गदर्शन मेळावे सतत आयोजित करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांनी ठेकेदार व कामगार यांच्यातील समन्वय वाढवण्याचे महत्त्व मांडले. ठेकेदारांनी कामगारांचा सन्मान राखावा, त्यांच्या समस्या वेळेवर सोडवाव्यात व नियमांनुसार सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मिस्त्री व मजूर बांधवांना आपल्या अडचणी व प्रश्न स्पष्टपणे संघटनेपुढे मांडण्याचेही आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सह संपर्क प्रमुख शिवसेना गड.हेमंतभाऊ जंबेवार,माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल कार्यालय गड.सीमा सिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, घनश्याम वाढई,शरद मेश्राम,अध्यक्ष केशवभाऊ लाटीलवार, कवळूजी वरगंटिवार,बाळूभाऊ मोहुर्ले,संजय बर्वे,रत्नदीप खेवले,विवेक वासेकर,सुधीर बांबोळे, दिलीप भोयर, कंत्राटदार, मजूर, मिस्त्री व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular