VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मनीषा ताई मडावी जिल्हाध्यक्षा महिला आघाडी राष्ट्रीय मानवाधिकार संघठण (असो) नई दिल्ली. जिल्हा गडचिरोली,
गडचिरोली, २२ सप्टेंबर २०२५::- दिनांक 21सप्टेंबर 2025 पुणे येथे नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती व स्नेह मिलन सोहळ्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचे नेतृत्वात 50 शेतकरी,सरपंच,उपसरपंच,राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदाधिकारी कार्यकर्ता चमुने सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रामुख्याने नाम फाउंडेशनचे चेअरमन नाना पाटेकर यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी यांनी भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य व सामाजिक,सांस्कृतिक विषयावर सविस्तर चर्चा केले.

यावेळी प्रामुख्याने आदिवासी समाजामध्ये परंपरागत रूढी परंपरा ने सुरु असलेला ” कुर्मा घर” संदर्भात नाम फाउंडेशनणे जनजागृती करणे बाबत चर्चा केली. आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष करून आदिवासी महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली व नाम फाउंडेशन च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यात कुर्मा घर बाबत जनजागृती करण्यासाठी व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत नाम फाउंडेशन च्या वतीने मदत करण्यात यावी अशी मागणी केली.

यावेळी नाम फाउंडेशन सोबत सकारात्मक चर्चा झाली. व नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्याचे येण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पौर्णिमा विश्वास संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक, देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल पाटील उईके,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,राकेश भाऊ खुणे, पुरुषोत्तम भाऊ गोबाडे, नितेश भाऊ खुणे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये,

किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल,गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे तालुका सचिव संतोष बुरांडे,तालुका सचिव दिनेश मुजुमदार,विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, पुष्पा करकाडे, पूनम हेमके विशाखा सिहं, लीना विस्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी, व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
