Friday, May 22, 2026
HomeGadchiroliपावसामुळे मराठवाडा हाहाकार,, जि.प.गडचिरोलीचे इंजिनिअरर्स कडून मदतीचा हात...

पावसामुळे मराठवाडा हाहाकार,, जि.प.गडचिरोलीचे इंजिनिअरर्स कडून मदतीचा हात…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मराठवाड्यात प्रंचड पावसाने व महापुराने थैमान घातले त्यामुळे गडचिरोली जिल्हा परिषदच्या प्रत्येकी इंजिनिअरर्स एक दिवसाचा पगार मराठवाड्यातील पाण्यामध्ये संकटात अडकलेल्या लोकांसाठी मदत,

गडचिरोली, २६ सप्टेंबर २०२५::- सद्यस्थितीत राज्यभरात व विशेषतः मराठवाड्यात प्रचंड पावसाने व महापुराने थैमान घातले असुन असंख्य गावे पुराने वेढली गेली आहेत.हजारो नागरीक पुरात अडकले असुन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.लाखो हेक्टर शेतीमधील हातातोंडाशी आलेला घास पुरामुळे हिरावला गेला असुन शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन आपला ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांशी नित्य संबंध असल्याने ,शेतकरी बांधव अडचणीत असतांना अशा परिस्थितीत आपण जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे आवश्यक आहे..त्यासाठी राज्यातील सर्व 34 जिल्हा परीषदेतील जवळपास 5000 अभियंत्यांनी स्वेच्छेने आपल्या मासिक वेतनातुन किमान एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे असे सर्वानुमते निर्णय झाला आहे.

त्यानुसार सर्व अभियंत्यांच्या वेतनातुन एक दिवसाचे वेतन कपात करावे याबाबत जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार ,मा.ना. एकनाथजी शिंदे ,ग्रामविकास विभागाचे मंत्री मा.ना. जयकुमार जी गोरे यांना निवेदन देण्यात आले असे जिल्हाध्यक्ष विक्रांत मेश्राम कार्याध्यक्ष किशोर सलामे कोषाध्यक्ष मंयुर रायपूरे यांनी मिळून शासनाला मदतीचा चेक पाठविले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular