Monday, June 8, 2026
HomeGadchiroli'आदी कर्मयोगी अभियान' उपक्रमांची जनजातीय कार्य मंत्रालय, दिल्लीच्या पथकाकडून पाहणी...

‘आदी कर्मयोगी अभियान’ उपक्रमांची जनजातीय कार्य मंत्रालय, दिल्लीच्या पथकाकडून पाहणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २६ सप्टेंबर २०२५:- जनजातीय कार्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथील संचालक (TRI व मीडिया), श्रीमती दिपाली मसीरकर, यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत गावांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. या दौऱ्याचा उद्देश गावपातळीवरील उपक्रमांचे थेट निरीक्षण करणे व त्या अनुषंगाने भावी धोरणे निश्चित करणे हा होता.

दौऱ्यातील प्रमुख भेटी व कार्यक्रम:-

या भेटीदरम्यान श्रीमती मसीरकर यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला:सावेला (ता. गडचिरोली): येथे PVTG (विशेषतः असुरक्षित आदिवासी गट) आणि CFR (सामुदायिक वन हक्क) सक्षमीकरण अंतर्गत सुरू असलेल्या रोपवाटिकेची पाहणी करण्यात आली.

केळीगट्टा (ता. गडचिरोली): ग्रामस्थांशी संवाद साधून मनरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या गॅबियन बंधाऱ्याची पाहणी केली. वडेगाव (ता. कुरखेडा): “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “आदी सेवा केंद्राचे” उद्घाटन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, वडेगाव क्लस्टर अंतर्गत असलेल्या गावातील ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन संवाद साधण्यात आला व अभियानाची माहिती देण्यात आली.

पुराडा (ता. कुरखेडा): येथील ग्रामपंचायत कार्यालयातील आदी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले व ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान श्री. रंणजीत यादव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी गडचिरोली, आणि श्री. कुशल जैन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अहेरी, तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी गडचिरोली उपस्थित होते.

याशिवाय, आदी सेवा अभियानाचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय मास्टर ट्रेनर्स, प्रकल्प व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, नोडल अधिकारी ऐकल सेंटर, जिल्हा परिवर्तन समिती, विविध विभागांचे ग्रामस्तरीय अधिकारी/कर्मचारी, ग्रामसभा सहयोगी मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular