Sunday, June 7, 2026
HomeAheriबहिणींना बतुकम्मा उत्सवासाठी धर्मराव बाबांकडून आर्थिक मदत...

बहिणींना बतुकम्मा उत्सवासाठी धर्मराव बाबांकडून आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, २९ सप्टेंबर २०२५::- दरवर्षीप्रमाणे यंदाही बतुकम्मा आणि नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करण्यात आली आहे. ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) चे माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार डॉ. मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने देण्यात आली.बतुकम्मा, जो तेलंगणामधील एक पारंपरिक आणि राष्ट्रीयस्तरावर साजरा होणारा उत्सव आहे, तो सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांसोबत पुरुष मंडळे देखील या उत्सवात सहभागी होतात.यंदाची आर्थिक मदत सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर भाऊ कोल्लूरी, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष, रवी कार्सपल्ली, आदिवासी सेलचे अध्यक्ष अशोक मडावी, संजीवकुमार मेडी, रवी कावरे, रमेश कार्सपल्ली, अनिल कोटा, शंकर गड्डी, श्रीनिवास कुळमेथे, पेंटय्या मंदाडे, गुंडा वेलादी, कोरके वेलादी, सिनू मडावी, गुत्ता वेलादी, बोडका गावडे, तिरुपती दुर्गम आदी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन वितरित केली.

ग्लासफोर्डपेटा, बामणी, वेंनेलाया, सिरकोंडा, गंगानूर, झिंगानूर, व्येंकटापूर, गरकापेटा आदी गावांमधील महिलांना ही मदत देण्यात आली. बहिणींनी या मदतीबद्दल आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम चे आभार मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular