Saturday, June 6, 2026
HomeGadchiroliप्रतिभाताई चौधरी यांचे नातू शिवाजीराव चौधरीने अमरावती जिल्हास्तरीय गणित परीक्षेत मिळविले अभूतपूर्व...

प्रतिभाताई चौधरी यांचे नातू शिवाजीराव चौधरीने अमरावती जिल्हास्तरीय गणित परीक्षेत मिळविले अभूतपूर्व यशमाजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले अभिनंदन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २७ ऑक्टोबर २०२५::- सूर्यकांत जोग गुरुकुल सैनिक स्कूल, चिखलदरा येथे शिक्षण घेत असलेला गडचिरोली जिल्ह्यातील शिवाजीराव सुशील चौधरी (इ. 8 वी) या विद्यार्थ्याने अमरावती जिल्हास्तरीय गणित संबोधन परीक्षेत ग्रामीण भागातून द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या जिल्ह्याचा मान उंचावला आहे.शिवाजीरावने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा. नारायण देव, आई-वडील आणि आजी यांना दिले आहे. गडचिरोली हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जात असताना, त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्याने असे यश मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.

विशेष म्हणजे शिवाजीराव यांचे वडील st महामंडळ मध्ये चालक असून बिकट परिस्थितीतुन याने हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी, नवेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू खंगार, तसेच आदिवासी विकास परिषदचे जिल्हा महासचिव उमेश उईके, सचिव सूरज मडावी, आजी प्रतिभा चौधरी, आई शितल चौधरी, गायत्री कोरडे, नंदाबाई कोरडे, तानाबाई पेटकर, छबू कोलते आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शिवाजीराव या विद्यार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी डॉ. होळी यांनी शिवाजीरावचे कौतुक करत म्हणाले की, “असेच परिश्रम घेत राहा, भविष्यात आणखी मोठे यश मिळवून आपल्या परिवाराचा व गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढवा.”

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular