Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २ कोटींच्या निधीला मंजुरीआमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या...

गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २ कोटींच्या निधीला मंजुरीआमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या पाठपुरवठ्याला यश…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०१ नोव्हेंबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामागे आमदार डॉ. मिलिंदजी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्याला यश आले आहे.या निधीतून जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण, रस्ते व पायाभूत सुविधा विकास, दिशादर्शक फलक उभारणी, पर्यटन माहिती केंद्रे, तसेच स्थानिक रोजगार निर्मितीच्या उपक्रमांना चालना मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यतत्परतेबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.या निधीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular