Friday, September 11, 2026
HomeAheriअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी : अजय कंकडालवार यांची...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी : अजय कंकडालवार यांची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, ०१ नोव्हेंबर २०१५::- महाराष्ट्रातल्या दक्षिण गडचिरोलीतील या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली आहे.राज्य सरकार व संबंधित विभागाने शेतकऱ्यांची पिकांची नुकसानीची तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कांकडालवार यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील शेतकऱ्यांची धान,हरभरा,खपूस,मिरची,मकासह आदि पिकांची नुकसान झाली.तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे घराही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या उभी पिके या अवकाळी पावसामुळे पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांची झालेल्या नुकसानीची मोका पंचनामे करून राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

संबंधित विभागाने तात्काळ नुकसानाची पंचनामे करा,अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन लोकशाही मार्गाने मोठा जनआंदोलन करणाऱ्याची अजय कंकडालवार यांनी संबंधित विभागाना इशारा देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular