VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी तहसीलदार यांचाकडे निवेदन देऊन केली मागणी, काशिनाथ मारोती बुरांडे उपसरपंच ग्रा. पं.विसापूर रे.,
गडचिरोली चामोर्शी, ३१ ऑक्टोंबर २०२५::- आमगाव (महाल) व परिसरातील नुकताच सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या शेतीतील हाता तोंडासी आलेले धान पिकाचे नासाडी(नुकसान) झाली आहे.अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आलेली आहे. परिसर धान उत्पादक म्हणून ओळखअसून मोठ्या प्रमाणामध्ये धान पिकाचे उत्पादन होत असते काही शेतकऱ्यांनी आपला धान कापणी करून आपल्या शेतामध्ये ठेवलेले तर काहीचे उभे पीक जमीनदस्त झाले आहे.
सदर समस्त धान पिकामध्ये व शेतीमध्ये पाणीच पाणी संग्रहित झालेला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे डोळ्यासमोर हातातोंडासी आलेला संपूर्ण पिक खराब झालेला आहे.व त्यामध्ये आता संपूर्ण पीक हातातून जातो आहे कुरुळ विसापूर जिल्हा परिषद क्षेत्रात शेतकरी हा अक्षरशा रडकुंडीला आलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा व झालेल्या नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावे अशी मागणी विसापूर रे चे उपसरपंच तथा समाजसेवक काशिनाथ मारोती बुरांडे यांनी निवेदन देत मागणी केली आहे यावेळी श्री. सुनील वेलादी. चेत्रम भुरसे. श्रीनिवास भयरवार. गोत्तम वाळके. रोहिदास बारसागडे व परिसरातील शेतकरी उपस्तितीत होते.
