VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /सिरोंचा, ०८ नोव्हेंबर २०२५::- सिरोंचा तालुक्यातील भूमीवर लोकशक्तीचा महासागर उसळला सन्माननीय अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत शेकडो जनसमुदायाने उपस्थित राहून आपला विश्वास प्रकट केला.तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींमधील सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसच्या विचारधारेवर निष्ठा व्यक्त करत भव्य पक्षप्रवेश केला.

सभेचे सुत्रसंचालन रवीभाऊ सल्लम यांनी अत्यंत प्रभावी व ऊर्जादायी पद्धतीने केले.ज्यामुळे संपूर्ण सभेचे वातावरण प्रेरणादायी बनले.अजयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली जनतेत नवा आत्मविश्वास आणि नवसंजीवनी निर्माण झाली.त्यांच्या प्रत्येक शब्दाने कार्यकर्त्यांच्या मनात जोश,तर जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला.“राजकारण हे सत्ता मिळविण्याचे साधन नसून, लोकसेवेचे व्रत आहे,”असा संदेश देत अजयभाऊंनी सर्वांना एकतेचा आणि विकासाचा मंत्र दिला.
शेतकऱ्यांच्या समस्या,तरुणांच्या संधी, महिलांच्या हक्कांबाबत त्यांनी ज्या प्रकारे हृदयस्पर्शी भूमिका मांडली,त्याने उपस्थितांचा हृदयस्पर्श केला.सभागृहात ‘जय अजयभाऊ! जय काँग्रेस!’ च्या घोषणांनी आसमंत दणाणला.प्रत्येकाच्या नजरेत आज नव्या आशेचा आणि परिवर्तनाचा प्रकाश होता.आजचा दिवस फक्त बैठक नव्हती,तो होता जनतेच्या विश्वासाचा उत्सव.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली सिरोंचा तालुका एकात्मतेच्या,विकासाच्या आणि न्यायाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे.
जय कांग्रेस ✊ जय अजयभाऊ,
