Sunday, June 7, 2026
HomeAheriअहेरीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज...

अहेरीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या निवास्थानी भेट…

VAINGANGA NEWS 24 विशेष/ प्रतिनिधी,

तालुक्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा,

गडचिरोली/अहेरी, ०८ नोव्हेंबर २०२५::- महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अहेरी येथील नव्याने उभारलेल्या महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आज अहेरी शहरात विकासाचा उत्साह पाहायला मिळाला.या कार्यक्रमानंतर माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी माजी राज्यमंत्री आणि अहेरी इस्टेटचे मालक राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या अहेरी येथील निवास्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी अहेरी तालुक्यातील विविध विकासकामे, स्थानिक समस्या आणि जनतेच्या अडचणी याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. तसेच, आगामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतांची देवाणघेवाण करण्यात आली.

ही बैठक अत्यंत सखोल आणि विधायक वातावरणात पार पडली असून माजी खासदार डॉ. नेते व राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये मंथन करण्यात आले.याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुतरमारे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, ज्येष्ठ नेते बादल शहा,ता.महामंत्री निखिल हलदार,विजय बिशवास, माजी अध्यक्ष संतोष मद्दीवार,उत्तम शर्मा, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकास, संघटन बळकटीकरणाच्या दिशा ठरविण्यात आल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular