Sunday, May 24, 2026
HomeGadchiroli०१सप्टेंबर२०२५ च्या निर्णया संबंधी महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी,म.रा.प्राथ शिक्षक मध्यवर्ती...

०१सप्टेंबर२०२५ च्या निर्णया संबंधी महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी,म.रा.प्राथ शिक्षक मध्यवर्ती संघटना निवेदनात मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,१२ नोव्हेंबर २०२५::- वर्ग १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा( टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 01 सप्टेंबर 2025 च्या निर्णया संबंधी महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी. या व इतर मागण्यांकरिता दि. 9 नोव्हेंबर 2025 ला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या सहभागाने मूक मोर्चाचे आयोजन केलेले होते.

परंतु नगरपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे मूक मोर्चा ची परवानगी मिळु शकली नाही.त्यामुळे आज दि. 10 नोव्हेंबर 2025 ला गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी यांनी मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे मार्फत महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री महोदय यांना या संदर्भातले निवेदन दिले.

यावेळी म. रा. प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर,म. रा.प्राथ. शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक देशमुख सर, म. रा. प्राथ. शिक्षक समितीचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस श्री साईनाथ अलोणे सर,आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रदिप सेलोकर सर, म.रा.प्राथ.शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस – श्री अशोक रायसिडाम सर, म.रा.प्राथ.शिक्षक संघाचे जिल्हाकोषाध्यक्ष- श्री राजेश चिलमवार सर, काॅस्टाईब शिक्षक संघटना गडचिरोली चे कार्याध्यक्ष श्री चंदु रामटेके सर,काॅस्टाईब शिक्षक संघटना गडचिरोली चे जिल्हाउपाध्यक्ष केंद्र प्रमुख श्री बांबोळे सर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular