Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliपक्षनिष्ठेचा उज्वल आदर्श! योगिता पिपरे यांची अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याने भाजपा नगराध्यक्षाच्या...

पक्षनिष्ठेचा उज्वल आदर्श! योगिता पिपरे यांची अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याने भाजपा नगराध्यक्षाच्या लढतीला मोठा फायदा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,२१ नोव्हेंबर २०२५::- गडचिरोलीपक्षनिष्ठा, संघटनशिस्त आणि विकासाची तळमळ जपणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्ष सौ. योगिता प्रमोद पिपरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज स्वेच्छेने मागे घेत पक्षनिष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. भाजपा नेतृत्वावर दाखवलेला दृढ विश्वास व पक्षहिताला दिलेले प्राधान्य यामुळे त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची उंची अधिक अधोरेखित झाली आहे.

याचा फायदा भाजपा च्या नागराध्यस पदाच्या अधिकृत उमेदवार सौं प्रणोती सागर निंबाळकर यांन्हा नक्कीच होणार आहे. भाजपाच्या विचारधारेवर पूर्ण श्रद्धा ठेवनाऱ्या, सौ. पिपरे यांना प्रभाग क्र. ३ (ब) – इंदिरानगर, स्नेहनगर प्रभाग क्र. 3 (ब)येथून भाजपाची अधिकृत नगरसेवकाची उमेदवारी मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. पारदर्शक कामकाज, लोकसंग्रह आणि महिला सबलीकरण क्षेत्रातील त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरल्याने नागरिकांत त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक लहर निर्माण झाली आहे.

नामनिर्देशन मागे घेताना माजी नगरसेवक मा. श्री.प्रमोदजी पिपरे,(लोकसभा समन्वयक) मा श्री बाबूरावजी कोहळे, नगर परिषद निवडणूक प्रभारी, मा श्री वैभव पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.सौ. योगिता पिपरे यांनी दाखवलेली प्रामाणिकता, निष्ठा आणि विकासाची बांधिलकी यामुळे त्यांचा मान–सन्मान भाजपा परिवारात अधिक उंचावला आहे. जनतेतील विश्वासाच्या जोरावर त्या इंदिरानगर/स्नेहनगर प्रभाग क्र. 03 मधून नगरसेवीका म्हणून भक्कम बहुमताने निवडून येतील, अशी व्यापक अपेक्षा व्यक्त होत आहे. भाजपाच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या ध्येयवाक्याला न्याय देत त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची नवी वाटचाल सुरू करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

—एकजूटितून विजयाकडे! योगिता पिपरे यांचा माघार निर्णय ! प्रणोती सागर निंबोरकर यांच्या पाठीशी ठाम उभेभाजपाच्या संघटननिष्ठेला सर्वोच्च मान देत सौ. योगिता पिपरे यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याने केवळ पक्षशिस्त बळकट झाली नाही तर भाजपाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या मनात सौ. पिपरे यांच्याविषयी अधिक आपुलकी, आदर आणि विश्वासाची भावना दृढ झाली आहे.पक्षाच्या विजयाला प्राधान्य देत सौ. पिपरे यांनी नगराध्यक्षपदासाठी सौ. प्रणोती निंबोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा घेतलेला निर्णय हा पक्षनिष्ठेचा अतूट आदर्श म्हणावा लागेल. त्यांच्या या निर्णायक पावलामुळे भाजपाची नगराध्यक्षपदाची लढत आणखी भक्कम झाली आहे.सौ. पिपरे यांच्या पाठिंबा व सहकार्यामुळे सौ. प्रणोती निंबोरकर यांची उमेदवारी अधिक मजबूत बनली असून गडचिरोली नगर परिषदेत भाजपाचा भगवा झेंडा फडकण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये अधिक दृढ झाला आहे. दोन्ही नेत्यांमधील परस्पर विश्वास, आदर व संघटनाशी असलेली निष्ठा हा भाजपाच्या मजबूत नेतृत्वाचा उत्तम नमुना ठरला आहे.आगामी निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळून नगर परिषदेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची चाहूल लागली असून, या एकजुटीमुळे पक्षकार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular