VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी,०९ डिसेंबर २०२५::- माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त चामोर्शीत आयोजित श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये विशेष म्हणजे सिंदेवाही तालुक्यातील शेकडो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कथावाचक गुरुदेवांचे अध्यात्मिक प्रवचन, भागवत महात्म्याचे रसाळ वर्णन आणि भजन-कीर्तनाच्या सुरावटींनी वातावरण दणाणून गेले. सिंदेवाहीसह परिसरातील श्रद्धालूंनी भागवत सप्ताहात सहभाग नोंदवून धार्मिक उत्साह साजरा केला.
कार्यक्रमस्थळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सिंदेवाही वरून आलेले भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करून आभार मानले. सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, हरिनाम संकीर्तन, पुराणकथांचे प्रवचन आणि प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
