VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नागपूर /गडचिरोली,१५ डिसेंबर २०२५::- दि.12/12/2025 शुक्रवार रोजी मा.ना.श्री.जयकुमारजी गोरे साहेब ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार मा.श्री.निरंजनजी डावखरे साहेब समवेत रविभवन नागपुर येथे महा.राज्य प्राथ.शिक्षक संघ राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांसमवेत शिक्षकांच्या विविध प्रश्न व मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा व निवेदन देण्यात आले.तब्बल एक तास मिटिंगसाठी देत सविस्तर चर्चा करुन पुर्णवेळ देत या प्रसंगी मा.श्री.जयकुमार गोरे साहेब (ग्रामविकास मंत्री , महाराष्ट्र राज्य) यांनी निवेदनातील शिक्षक ,विद्यार्थी व शाळा अनुषंगाने 13 मागण्या संदर्भात सर्व मागण्या प्रश्नांची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मंत्रालय मुंबई येथे संघटनेस आमंत्रित करुन सर्व प्रश्न व मागण्यावर लवकरच बैठक घेऊन निकाली काढण्यात येतील असे आश्वासित केले.
प्रमुख मागण्या:-

१. महाराष्ट्रातील जिल्हा परिषेदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवता पुर्ण शिक्षण देण्यासाठी शाळांना खालील सुविधा मिळणे बाबत.
अ. शाळांची वीज बिल D.P.D.C. मधून किंवा ग्रामपंचायत मधील विविध योजनांमधून भरणे बाबत.
ब. जि. प. शाळांना Wifi सुविधा व डिजीटल बोर्ड मिळणे बाबत.
क. शाळांना परसबागेसाठी ठिबक सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देणे बाबत.
ख. विदयार्थ्यांचा शारिरीक विकास होण्यासाठी केंद्र पातळीवर क्रिडा शिक्षकांची निवड होणे बाबत.
ग. शौचालय व मुतारी यांची स्वच्छता होणे साठी एखादी यंत्रणा तयार करणे बाबत.
२. मुख्यालयी राहण्याची अट ५ कि. मी. पर्यंत शिथील करणे बाबत.

३. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणासाठी एकच गुणवत्ता अभियान राज्यावरून सुरू करण्यात यावे त्यामुध्ये एक वाक्यता असली पाहीजे.
४. प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबविणे बाबत.
५. जिलहांतर्गत बदली धोरणामध्ये बदल करणे बाबत.
6. ६. बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी अपंगत्वाचा लाभ घेऊन बदली घेतली आहे त्या बाबत.
७. प्रधानमंत्री पोषण आहाराची गुणवत्ता वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीची मदत मिळणेबाबत.
८. शिक्षकांना १०/२०/३० अश्वासीत प्रगती योजना लागू करणेबाबत.
९. TET बाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पत्र पाठवून दुरूस्ती विधेयक सादर करण्यासाठी विनंती करणे.
१०. B.L.O. च्या कामातून प्राथमिक शिक्षकांची सुटका करणे बाबत.
११. पदविधर शिक्षकांना सरसकट पदविधर वेतन श्रेणी देणेबाबत.
१२. जि. प. प्राथमिक शाळांच्या संचमान्यता निकषांमध्ये अमुलाग्र बदल करणे बाबत.
१३. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्यातील १०० शाळा आदरणीय दत्तात्रेय वारे गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली विकसीत करण्याचे अभियान राबविण्याचे ठरविले आहे यास पाठींबा मिळणेबाबत.

सदर बैठकीसाठी महा.राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याध्यक्ष मा.श्री.केशवराव जाधव,जेष्ठ सल्लागार मा.श्री.दि.रा.भालतडक , राज्य सरचिटणिस मा.श्री.लायक पटेल ,राज्य कार्याध्यक्ष श्री.लोमेशजी व-हाडे ,राज्य संपर्कप्रमुख मा.श्री.बापुसाहेब तांबे अहिल्यानगर ,सल्लागार मा.श्री.अनंत चौधरी यवतमाळ ,राज्य मार्गदर्शक मा.श्री.निळकंठ चोंडे ,मा.श्री.जीवनराव वडजे पाटील नांदेड,नागपुर जिल्हाध्यक्ष मा.श्री.उमाकांत अंजनकर,वर्धा जिल्हाध्यक्ष मा.श्री.अरुणजी झोटींग,चंद्रपुर जिल्हाध्यक्ष मा.श्री.सुभाष बेरड,गडचिरोली शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.रघुनाथ भांडेकर , गडचिरोलीचे जिल्हा सरचिटणीस अशोक राॅयसिडाम,चामोर्शी तालुकाध्यक्ष श्री मारोती वनकर,श्री सुनिल सातपुते, श्री राजेश मुर्वतकर,श्री अविनाश भोवरे,श्री रविंद्र आडे,श्री जगदीश कळाम,श्री हरिष नंदनवार,श्री प्रल्हाद चव्हाण,श्री राजकुमार कुळसंगे,श्री चंद्रकांत वेटे,श्री सुधीर गायकवाड,नांदेड जिल्हाध्यक्ष मा.श्री.शंकर हसगुळे ,मा.श्री.संजय पाटील अंबुरे, वर्धा जिल्हा सरचिटणिस श्री.सुनिलजी कोल्हे ,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अजयभाऊ गावंडे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री.सचिन बटाले ,समुद्रपुर तालुका अध्यक्ष मा.श्री.प्रेम भोजनकर ,सेलु तालुका सचिव श्री.निलेश चौधरी आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
