Tuesday, January 6, 2026
HomeGadchiroliयश–अपयशाला न जुमानता संघर्षासाठी सज्ज व्हा – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन...

यश–अपयशाला न जुमानता संघर्षासाठी सज्ज व्हा – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

काँग्रेसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार,

गडचिरोली,०३ जानेवारी २०२६::- गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जयंती कार्यक्रम तसेच काँग्रेसच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, आयुष्यात यश–अपयश हे येतच असते; मात्र अपयशाला न जुमानता ज्या पद्धतीने ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष करून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, त्याच प्रेरणेतून आपण सर्वांनी समाजासाठी आणि संघटनेसाठी सदैव संघर्षासाठी सज्ज राहिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले.

या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष ॲड. रामभाऊ मेश्राम, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजित कोवासे, रोजगार सेल जिल्हा कार्याध्यक्ष पुष्पलताताई कुमरे, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, नेत्या आशाताई तुलावी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, माजी सभापती विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गडचिरोली तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष कल्पना नंदेश्वर, पौर्णिमाताई भडके, कविताताई उराडे, रीताताई गोवर्धन, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, शीतलताई ठवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सतीशजी विधाते, श्रीकांतजी देशमुख, रमेशजी चौधरी, परागजी पोरेड्डीवार, सौ. मनीषाताई खेवले, मेघाताई वरगंटिवार; आरमोरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक अक्षयजी बागडे, माणिकजी भोयर, सौ. लताताई डोकरे, सौ. मेघाताई मने; तसेच वडसा (देसाईगंज) नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक विकासजी प्रधान, शामजी उईके, सौ. राधिकाताई पत्रे, सौ. मंदाताई समर्थ, सौ. गुरमितकौरताई चावला, सौ. आशाताई दहिवले, सौ. फैमीदाताई पठाण यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....