VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी,०३ जानेवारी २०२६:;- अहेरी शहरात आज दुपारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक जाणीव जपत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटक *अर्चनाताई कावळे मॅडम* होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमास *रामचंद्रजी गुरनुले (सेवा निवृत्त शिक्षक), अशोक निकुरे, सागर गारुत्रे, रियाजभाई शेख (जिल्हा कार्याध्यक्ष, गडचिरोली)* तसेच *नामदेवजी गुरनुले (सेवा निवृत्त नायब तहसीलदार)* यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे *सुत्रसंचालन दीपक गुरुणुले* यांनी केले. त्यांनी कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पाडला.
यावेळी *रियाजभाई शेख* यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर दोन शब्दांत सखोल प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता व न्यायासाठी केलेले संघर्ष आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालण्याचा आणि समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
