Tuesday, January 6, 2026
HomeGadchiroliआमदार मिलिंद भाऊ नरोटे व डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचे हस्ते गडचिरोली...

आमदार मिलिंद भाऊ नरोटे व डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचे हस्ते गडचिरोली येथे डान्स क्लास व मॉडेलिंग सेंटर चे भव्य उदघाट्न!…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,०३ जानेवारी २०२६::- दिनांक 2 जानेवारी 2026 गडचिरोली येथील खरपुंडी नाक्या समोर सामाजिक कार्यकर्ते जिल्हा परिषद शाळा शिक्षक जगदीश पाटील मडावी,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी यांचे भव्य निवासस्थान वास्तुपूजन व मुलीचे नामकरण निमित्ताने अतिदुर्गम, आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गोरगरीब, शोषित, वंचित,आदिवासी एससी,एसटी,ओबीसी व सर्वसाधारण,समाजातील युवक युवती नागरिक यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ, मिलिंद भाऊ नरोटे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या शुभ हस्ते भव्य डान्स क्लास व मॉडेलिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले .

 यावेळी उपस्थित यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे, डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी मार्गदर्शन केले व यावेळी धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्ना यांच्या वायरल गाण्यावरील डान्स प्रस्तुत करून भव्य शुभारंभ करण्यात आले,

यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चातगाव येथील सरपंच गोपाल पाटील उईके ,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा नेते अनिल भाऊ पोहनकर, रमेश भूरसे, अविनाश विश्रोजवार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,

जिल्हा उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये, तालुका सचिव दिनेश भाऊ मुजुमदार, महिला आघाडी नेत्या लीना ताई विश्वास व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....