VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/एटापल्ली, ०४ जानेवारी २०२६::- एटापल्ली तालुक्यातील *वांगेतुरी* ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या *मौजा- इंदूर* गावात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार *धर्मरावबाबा आत्राम* यांच्या आदेशानुसार GPS द्वारे मोजणी प्रक्रिया राबविण्यात आली. या मोजणीवेळी *युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम* उपस्थित होते.
मोजणीच्या कामकाजासाठी वन व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते. यामध्ये *वनपाल मा. कोरेत सर,* तलाठी सौ. *हिचामी मॅडम* आणि वनरक्षक *सौ. कन्नाके मॅडम* यांचा समावेश होता.
या प्रक्रियेत गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यामध्ये *रमेश मटामी, अक्षय मटामी, ईश्वरलाल कुजूर, गणेश मटामी, पोरी मटामी, अक्षय एक्का, चंदू हलामी, सोमा मटामी, संजय मिंज व पेका कोडवा* यांचा समावेश आहे.
यावेळी *विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, लक्ष्मण नरोटे, राजू नरोटे, गिरिश नरोटे, चेतन हिचामी, अनिकेत,योगेश तलांडे, आकाश राऊत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अहेरी तालुका अध्यक्ष तिरुपती मडावी* यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
या GPS मोजणीअंतर्गत एकूण ३७ नागरिकांची मोजणी करण्यात आली. या उपक्रमामुळे संबंधित विषयात पारदर्शकता येणार असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
