Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliजलस्रोत टिकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा...

जलस्रोत टिकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कारवाफा येथील राजीव गांधी शाळेचा उपक्रम 

गडचिरोली,१६ जानेवारी २०२६::- श्री प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था नागपूर द्वारा संचालित कारवाफा येथील राजीव गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे 

 शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाच्या माध्यमातून हरित सेनेच्या या विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व कळावे, पाण्याचे स्त्रोत कसे वाढवता येईल, पाणी अडविल्याने भुजल साठा कसा वाढेल ,जमिनीत पाणी मुरल्याने जमिनीची सुपीकता कशी वाढेल, उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई कशी कमी करता येईल, परिसरातील गुरे जनावरांना पाणी कसे उपलब्ध होईल, शेतातील शेत पिकांना पाणी कसे देता येईल, या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी कृतीतून विद्यार्थ्यांच्या हाताने हा बंधारा बांधून त्यांना माहिती देण्यात आली याप्रसंगी प्रतिष्ठित नागरिक रमेश मडावी, माजी विद्यार्थी गणेश गर्तुलवार,महेश जिल्लेवार,लोमेश मालबेलवार,साक्षी सोदुरवार,मिनाक्षी सोदुरवार श्रृती चिट्टलवार,पालक दामा उसेंडी शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम मारबोनवार ,सुरेश सहारे,हरिचंद्र बर्लावार,अजय पेलबेलवार,कु.रुपाली शेंडे, प्रणय राहुड,मोरेश्वर सुमटकर,नजीरखाँ पठाण,परमानंद कोटनाके ,विद्यार्थी हरितसेना प्रमुख अनिकेत मेकलवार व शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular