VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
राज्य सरकारने एटापल्ली तालुक्यातील दररोज जीवघेणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करावे,
डॉ.प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,
गडचिरोली/एटापल्ली,१४ फेब्रुवारी २०२६::- अहेरी विधानसभा मतदारसंघातील एटापल्ली या तालुक्यांमध्ये देशभरातील सर्वात मोठे गौण खनिज उत्खनन सुरु केंद्र आहे
येथील गौण खनिज उत्खननामुळे संपूर्ण देशभरात स्टील उद्योगास चालना मिळत आहे.
परंतु या तालुक्याचे वाताहत संपूर्ण देशात सर्वात जास्त आहे असे दिसून येत आहे,
या बद्दल येथील स्थानिक सुशिक्षित पत्रकार बांधव यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आंदोलन करायला मजबूर झालेले आहेत.
कारण या भागात दररोज होणारे अपघात हे पाहण्याजोगे नाही?
प्रामुख्याने येथील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे दररोज होणारे अपघात व दररोज उद्ध्वस्त होणारे कुटुंब यांचे दुःख पाहण्यासारखे नाही?
या ठिकाणची रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय व संपल्यागत आहे परंतु राज्य सरकार व जिल्हा प्रशासन यांनी पूर्णपणे मौन बाळगून आहेत याबद्दल अतिशय नाराजी व्यक्त करण्यात येत आहे?
राज्य सरकारने येथील रस्त्याची पुलियाची दयनीय अवस्था दुरुस्त करावी व येथील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी येथील पत्रकार संघटनेने केलेला आहे? या पत्रकार संघटनेच्या आंदोलनाला व सुरू असलेल्या उपोषण मंडपास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, मानवाधिकार संघटन नेते रमेश अधिकारी, महेश बनसोड, प्रवीण भाऊ गेडाम यांनी भेट दिली. व या आंदोलनास उपोषणास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला व राज्य सरकारला एटापल्ली तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था दूर करण्याची मागणी केली व पत्रकार संघटनेने पुकारलेल्या या आंदोलन यलगार व उपोषणास जाहीर पाठिंबा घोषणा घोषित केली तरी राज्य सरकारने सदर मागणी पूर्ण करावी व एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना
न्याय द्यावा अशी मागणी केली व याबाबत राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व राज्याचे महामाहीम राज्यपाल महोदय यांची सुद्धा भेट घेऊन सदर विषयाबाबत पुढाकार घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केले.
