Friday, May 22, 2026
HomeGadchiroliगडचिरोली येथे 'शिवजन्मोत्सव' सोहळा मोठ्या उत्साहात साजरा...

गडचिरोली येथे ‘शिवजन्मोत्सव’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती,

गडचिरोली ,२० फेब्रुवारी २०२६::- स्थानिक जय छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप,नेहरू वार्ड,गडचिरोली यांच्या वतीने “शिवजन्मोत्सव” सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.परिसरात दिवसभर शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमास अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना राजे साहेब म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य,धैर्य,कुशल प्रशासन आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर स्वराज्य उभे केले.त्यांच्या कार्यामुळे भारतीय इतिहासात स्वातंत्र्य,स्वाभिमान आणि न्याय यांचे प्रतीक निर्माण झाले.आजही ते आदर्श नेतृत्वाचे प्रेरणास्थान मानले जातात.आजच्या युवा पिढीने त्यांची प्रेरणा घ्यावी,असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी शिवभक्तांनी जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम,देशभक्तीपर गीते तसेच शिवचरित्रावर आधारित भाषणांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा प्रणितीताई निंबोरकर,युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,माजी जिल्हा अध्यक्ष भाजप प्रशांतजी वाघरे,माजी आमदार नामदेवजी उसेंडी,न प सभापती मुक्तेश्वर काटवे,सागर निंबोरकर,नगरसेविका गुड्डीताई मारबते,नंदू कयारकर,शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते,मधुर हेमके, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular