Friday, May 22, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हा अधिवेशन मोठ्या संख्येने व उत्साहात संपन्न...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हा अधिवेशन मोठ्या संख्येने व उत्साहात संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,१६ मार्च २०२६::- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली द्वारे दिनांक 15 मार्च 2026 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे जिल्हा अधिवेशन मोठ्या संख्येने व उत्साहात संपन्न झाले. सदर अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे, शासन व प्रशासन स्तरावरील विविध समस्या त्यावर उपाय योजना तसेच नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येणाऱ्या विविध अडचणी व उपाय मराठी माध्यमाच्या शाळांचे भवितव्य व शासनाची भूमिका अशा विविध शैक्षणिक समस्यांवर सखोल मार्गदर्शन मा. नागो गाणार राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागपुर विभाग नागपूर तसेच मा. पुजाताई चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख यांनी जिल्ह्यातील उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना मार्गदर्शन केले.

मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवीन पिढितिल नवनियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षक संघटनेशी प्रत्यक्ष जुळून विचारमंथन करावे आणि शिक्षक संघटनेला अधिक बळकट करण्याची गरज आहे.. अन्यथा भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण होणार.त्याची झळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच बसणार अशी परिस्थिती निर्माण होते आहे.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना बळकट करण्याची आणि विश्वनिय नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी शिक्षक बांधवांनी प्रयत्न करावे.

आपण सर्व मोठ्या संख्येने जिल्हा अधिवेशनात उपस्थित झाल्या बद्दल राज्य पदाधिकारी, विभाग पदाधिकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुक्यातील तालुका पदाधिकारी, व जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार.

संतोष सुरावार – जिल्हा पालक तथा विभाग कोषाध्यक्ष नागपूर विभाग नागपूर 

अनिल नुतिलकंठावार – जिल्हा अध्यक्ष ,

सागर आडे – जिल्हा कार्यवाह.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा गडचिरोली,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular