Friday, May 22, 2026
HomeGadchiroliपंडित दिनदयाल उपाध्याय ‍ महिला रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न...

पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ महिला रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२० मार्च २०२६::- नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली,महिला महाविद्यालय, गडचिरोली व फुले, आंबेडकर महाविद्यालय , गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 मार्च 2026 रोजी महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ महिला रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.

         सदर रोजगार मेळाव्यास एकुण 100 पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे. LIC, गडचिरोली व संसूर श्रुष्ठी या नामांकित दोन उद्योजकांनी सहभाग घेतलेला असून दोन्ही उद्योजकांनी विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यांत आल्या . त्यामध्ये एकुण 46 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली आहे. व उर्वरित उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यांत आले आहे. 

        पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ महिला रोजगार मेळाव्यास अध्यक्ष्य म्हणून लाभलेले प्राचार्य, डॉ.योगेश पाटील, महिला महाविद्यालय,गडचिरोली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राचार्य डॉ.रूपेंद्रकुमार गौर, फुले ,आंबेडकर, कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे व मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल श्रीमती.प्रियंका इडपात्रे यांनी रोजगार मेळाव्याचे प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राध्यापक,डॉ.कुंदन दुफारे, महिला महाविद्यालय,गडचिरोली यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.     

        सर्व प्रमुख पाहुण्यांनी उमेदवारांना सदर रोजगार मेळाव्यातील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध रिक्त पदांबददल उमेदवारांना मुलाखती घेवून माहिती दिली. आणि सदर मेळाव्यास अध्यक्ष म्हणून प्राचार्य, डॉ.योगेश पाटील, महिला महाविद्यालय,गडचिरोली यांनी अध्यक्षीय भाषण संपवून उपस्थित सर्व उमेदवारांचे, उद्योजकांचे, उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी या सर्वांचे आभार व्यक्त केले. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी दिली आहे. 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular