Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliदेवापुर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान...

देवापुर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मोफत आरोग्य शिबिरासह विविध योजनांचा ५४८ नागरिकांनी घेतला लाभ,

गडचिरोली ,०८ एफ्रिल २०२६::- तालुका गडचिरोली अंतर्गत देवापुर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा नुकताच उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, मत्स्य विकासचे सहाय्यक आयुक्त श्री. डोंगरे, सरपंच श्री. शिवाजी गावडे, ग्रामसेवक श्री. संजय नैताम तसेच श्री. सुधाकर दुगा, विलास पोटावी, दिनेश किरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील नऊ गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमादरम्यान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. गावाला आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.अभियानांतर्गत विविध विभागांकडून महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा करण्यात आली. कौशल्य विकास विभागामार्फत १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समाज कल्याण विभागामार्फत गावात अद्ययावत वाचनालय उभारण्यात येणार असून महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान आवश्यक सुविधा असलेले ‘मावा आसकंना लोन’ उभारले जाणार आहे. मत्स्य विकास विभागामार्फत तलावांचे खोलीकरण तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

मोफत आरोग्य शिबिरात एकूण ५४८ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी ४५ नागरिकांची आयुष्मान भारत कार्डे काढून देण्यात आली, तर २२ जणांचे वय वंदन योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली. शिबिरात महिला, बालके, गर्भवती माता, डोळ्यांचे आजार तसेच सिकलसेल तपासणी आदी विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

 

शिबिरात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. आशीष शेडमाके, डॉ. मनोहर मडावी, डॉ. नितीन मसराम, डॉ. उईके (प्राथमिक आरोग्य केंद्र पोटेगाव), डॉ. लालाजी वट्टी व डॉ. शानगोंडा यांनी सेवा दिली. तसेच आरोग्यमित्र नेहाल भानारकर व संतोष कुकडकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular