Friday, May 22, 2026
HomeChamorshiकामासाठी प्रगणकांना Android -12 Version असलेला मोबाईल उपलब्ध करुन देण्यात यावे...

कामासाठी प्रगणकांना Android -12 Version असलेला मोबाईल उपलब्ध करुन देण्यात यावे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी तालुक्यातील शिक्षकांची तहसीलदार तथा चार्ज अधिकारी श्री प्रशांत घोरूडे साहेब यांचेकडे मागणी.

गडचिरोली/चामोर्शी, ०३ मे २०२६::- देशभरात सुरू झालेल्या जनगणना प्रक्रीयेत प्रगणक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत.जनगणना कामासाठी प्रगणकांना Android Version -12 असलेला मोबाईल आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे‌ परंतु बहुतांश शिक्षकांकडे Android Version -12 असलेले मोबाईल उपलब्ध नाहीत.

त्यामुळे जनगणना – HLO ॲप्स डाऊनलोड होत नाही. त्यासाठी Android Version – 12 असलेलाच मोबाईल आवश्यक आहे.परंतु सद्यस्थितीत बहुतांश प्रगणकांकडे 12 – Version असलेले मोबाईल उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनगणना कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.

Oplus_131072

म्हणून प्रशासनाने जनगणना कामासाठी आवश्यक त्या सुविधा प्रगणकांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत व Android Version – 12 असलेला मोबाईल प्रगणकांना जनगणनेच्या कामासाठी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे.अशी मागणी चामोर्शी तालुक्यातील शिक्षकांनी प्रशासनाकडे केलेली आहे.

Oplus_131072

प्रशासनाकडे निवेदन देतांना चामोर्शी तालुक्यातील ७९ शिक्षकांच्या स्वाक्षरी असुन यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,अशिम बिश्वास,संतोष चावरे,सुनिल सातपुते,राजकुमार कुळसंगे, जगदिश बावणे,बिजन मंडल,गोविंद बिडगर,रोहीदास कुनघाडकर,दिवाकर पेंदोर,काळबाजीवार सर, नारदेलवार सर,मनोहर केंद्रे,भैसारे सर,चोले सर,आर.बी.जुरे,संदिप शेळके आदी शिक्षक बंधू उपस्थित होते.

Oplus_131072
RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular