Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliप्रमोद पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती...

प्रमोद पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

 गडचिरोली,०२ जुलै २०२६::- जिल्हयातील प्रतिष्ठीत नागरिक तथा तेली समाजबांधवांशी दांडगा जनसंपर्क असलेले तेली समाजातील सक्रीय नेते प्रमोद पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पिपरे यांची नियुक्ती महासभेचे राज्याध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.

सहा महिन्यापुर्वी चामोर्शी येथील नगरसेवक आशिष पिपरे यांची महाराष्ट प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र आशिष पिपरे यांची नियुक्ती रद्द करून गडचिरोली शहरातील प्रतिष्ठीत नागरिक तथा जिल्हयातील तेली समाजबांधवांशी नाळ जुळलेले समाजातील जेष्ठ नेते प्रमोद पिपरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. प्रमोद पिपरे यांनी आपल्या पदाचा उपयोग समाजातील गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा अशी अपेक्षा माजी. महासभेचे राजाध्यक्ष रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे. 

प्रमोद पिपरे यांच्या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular