Saturday, September 12, 2026
HomeAlapalliआलापल्लीत २६ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या...

आलापल्लीत २६ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

प्रेमविवाह ठरलेला असतानाही टोकाचे पाऊल, कारण अद्याप अस्पष्ट,

गडचिरोली/आलापल्ली,१६ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील रहिवासी व सध्या आलापल्ली येथे भाड्याच्या खोलीत राहून सुरजागड कंपनीच्या खमनचेरू स्टॉकयार्डमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या २६ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १५ जुलै) रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे आलापल्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत युवतीचे नाव स्नेहा हिवराज कुमरे (वय २६, रा. मार्कडा, ता. चामोर्शी, ह.मु. आलापल्ली) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा कुमरे ही खमनचेरू येथील सुरजागड कंपनीच्या स्टॉकयार्डमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. मागील काही महिन्यांपासून तिचे त्याच कंपनीत पोकलेन चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांनी या नात्याला संमती देत पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, सर्व काही सुरळीत सुरू असतानाच स्नेहाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बुधवारी रात्री सुमारे १०:४० वाजता स्नेहा राहत असलेल्या खोलीच्या घरमालकिणीने तिच्या आईला फोन करून स्नेहाने खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने आलापल्ली गाठले. अहेरी पोलिसांच्या मदतीने तिला खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर गुरुवारी (दि. १६ जुलै) पहाटे १ वाजताच्या सुमारास तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी मृत स्नेहाची आई शिला हिवराज कुमरे यांच्या तोंडी फिर्यादीवरून तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय मेमोच्या आधारे अहेरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले व महिला पोलीस नाईक मनिषा मुलकवार पुढील तपास करीत आहेत.

टीप : आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांचा तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणाबाबत तर्क लावणे योग्य ठरणार नाही.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular