VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/आलापल्ली,०८ फेब्रुवारी २०२६::- आलापल्ली येथील स्व.राकेश कन्नाके व स्व.साईनाथ नाईनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ एकता स्पोर्टींग क्लब आलापल्ली तर्फे भव्य दिवस व रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.

आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक *मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* यांचाहस्ते करण्यात आली आहे.

कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतू मडावी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप गंजीवार,अज्जू पठाण,मनोज सडमेक,सदस्य आलापल्ली जगताप मॅडम,प्रकाश घोडमारे सर,रज्जाक पठाण,बुराण सर,सलीम भाई,श्रीमती सुमन खोब्रागडे,कडते काकू,सुगंध मडावी,उषा आत्राम,शोभन कोंड्रॉवर, संतोष तोडसाम,किशोर सडमेक,स्वामी वेलदी होते.

यावेळी परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक आलापल्ली येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
