VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
काँग्रेसनेते डॉ.अजय कंकडालवार यांनी दिल्या शुभेच्छा,
गडचिरोली /आलापल्ली,०६ मे २०२६::- येथील प्रतिष्ठित नागरिक मुसली बंदूकवार यांचे एकैक चिरंजीव वर-वेंकटेश आणि तेलंगणातील कोटापल्ली तालुक्यातील मलमपेठा येथील पोशम दगाम यांची ज्येष्ठ कन्या वधू-सुप्रजा यांचा शुभविवाह सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.वधूच्या राहत्या घरी,म्हणजेच तेलंगणातील मलमपेठा येथे हा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि मांगल्याच्या वातावरणात संपन्न झाला.
विवाह सोहळ्यानंतर आज आलापल्ली येथे वर-वधूच्या आगमनानिमित्त आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी एका भव्य स्वागत समारंभाचे आयोजन लखमवार परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष *डॉ.अजय कंकडालवार* व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी यांची उपस्थिती.त्यांनी या स्वागत समारंभाला प्रत्यक्ष भेट देऊन नवदाम्पत्याला पुष्पगुच्छ,भेट वस्तू देऊन आशीर्वाद दिले.
वेंकटेश आणि सुप्रजा यांचा संसार सुखाचा,समृद्धीचा आणि आनंदाचा जावो, अशा शब्दांत अजय कंकडालवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी दगाम आणि बंदूकवार या दोन्ही परिवारांनी आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले.राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवून नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.या विवाह सोहळ्यामुळे आलापल्ली आणि मलमपेठा या दोन गावांमधील स्नेहबंध अधिक घट्ट झाले आहेत.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण यांच्या सह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
