Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliमार्कंडा देवस्थान येथील एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा...

मार्कंडा देवस्थान येथील एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून रात्री विकास व संवर्धन कामांची पाहणी,

अतिक्रमणाबाबत पर्यायी व्यवस्थेच्या सूचना; वाहतूक व्यवस्थापनाचाही आढावा,

गडचिरोली ,१८ ऑगस्ट २०२६::- मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल रात्री प्रत्यक्ष पाहणी केली. एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या कामांना गती देऊन ती येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश हे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी मार्कंडा परिसरातील कामांची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची माहिती घेतली.

एमएसआरडीसीच्या अखत्यारित सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांचे योग्य नियोजन करून त्यांना आवश्यक गती द्यावी आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. विशेषतः एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत मार्कंडा परिसरात सुरू असलेल्या कामांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून या कामांच्या सद्यस्थितीची व प्रगतीची माहिती त्यांनी घेतली.

दरम्यान, परिसरातील अतिक्रमणाच्या अनुषंगाने संबंधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा तसेच त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मार्कंडा परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाबाबतही जिल्हाधिकारी श्री. पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रमेश यांनी चर्चा केली. परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिल्या.

मार्कंडा परिसरातील विविध कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular