VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सुधाकर कोहळे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा,
आरमोरी व कुरखेडा येथे पदवीधर मतदारांशी संवाद; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे आवाहन,
गडचिरोली /आरमोरी / कुरखेडा, २१ ऑक्टोबर २०२६ ::- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आरमोरी व कुरखेडा येथे शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधत निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरमोरीत शिक्षण संस्थेत बैठक :-
आरमोरी येथील प्रेरणा शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे पदवीधर मतदारांशी संवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधर मतदारांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.
यावेळी माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, संस्थेचे अध्यक्ष मदनजी मेश्राम, सचिव प्रशांत मेश्राम, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव भारत बावणथडे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री अक्षय हेमके यांच्यासह भाजपा पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कुरखेड्यात विविध शैक्षणिक संस्थांना भेटी :-

आरमोरीनंतर डॉ. अशोकजी नेते यांनी कुरखेडा येथील विविध शैक्षणिक संस्थांना भेट देऊन प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यामध्ये श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, डी.के. महिला महाविद्यालय, श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, संस्कार फाये पब्लिक स्कूल, शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, स्वर्णदीप हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज आणि विकास महाविद्यालयाचा समावेश होता.

या भेटीदरम्यान पदवीधर मतदारांच्या विविध समस्या, अपेक्षा आणि निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षक व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, प्राचार्य राजुभाऊ मुनघाटे, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, ओबीसी नेते रवींद्र गोटेफोडे, भाजप युवा नेते सागर निरंकारी, प्राचार्य गेडाम सर, प्रा. नितीन काळबांधे, प्राचार्य नागेश फाये, संस्थापक पी. आर. आकरे, प्राचार्य आर. एम. अलगदेवे, प्राचार्य एस. वाय. कांबळे, विस्तारक बळी सर, विनोद नागपुरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन :-

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेता पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेण्यावर या बैठकांमध्ये भर देण्यात आला. आरमोरी व कुरखेडा येथील या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
“पदवीधर मतदारांनी आपले बहुमूल्य प्रथम पसंतीचे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी विठ्ठलराव कोहळे यांना देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,” असे आवाहन माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी केले.
या दौऱ्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरमोरी व कुरखेडा परिसरातील शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधर मतदारांशी संपर्क साधण्यावर भाजप-महायुतीने भर दिल्याचे दिसून आले.
