Thursday, October 22, 2026
HomeGadchiroliजिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याला ८० कोटींची मंजुरी; खेळाडूंना मिळणार अत्याधुनिक सुविधा...

जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याला ८० कोटींची मंजुरी; खेळाडूंना मिळणार अत्याधुनिक सुविधा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अॅथलेटिक ट्रॅक, जलतरण तलाव, विविध मैदाने व खेळाडूंसाठी वसतिगृहाची सुविधा,

गडचिरोली ,१९ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्याच्या कामांना मोठी चालना मिळाली आहे. तब्बल ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांना मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व सरावाच्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसऱ्या टप्प्यात क्रीडा संकुल परिसरात अॅथलेटिक ट्रॅक, जलतरण तलाव, विविध प्रकारची मैदाने तसेच खेळाडूंसाठी सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना सरावासाठी आवश्यक पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

गडचिरोलीसारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असून, अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. मात्र, अत्याधुनिक क्रीडा सुविधांचा अभाव ही मोठी अडचण होती. जिल्हा क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणामुळे ही उणीव भरून काढण्यास मदत होणार आहे.

प्रस्तावित सुविधांमुळे अॅथलेटिक्स, जलतरण आणि विविध मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना प्रशिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होईल. तसेच बाहेरील ठिकाणी सरावासाठी जाण्याची खेळाडूंची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची सुविधा मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध होण्याचा मार्गही या मंजुरीमुळे सुलभ झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर गडचिरोलीची क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular