VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
राजस्थान/बिकानेर,२९ ऑगस्ट २०२६::- महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असताना आमदार बंटीभाऊ भांगडिया आणि माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी बिकानेर येथील प्रसिद्ध ‘आपणा घर आश्रमाला’ सदिच्छा भेट दिली. यावेळी आश्रमातील निराधार व मनोरुग्ण प्रभुजींची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या आरोग्याची तसेच आश्रमातील सेवा-सुविधांची माहिती घेतली.

रक्षाबंधनाच्या पर्वाचे औचित्य साधत आमदार बंटीभाऊ भांगडिया व डॉ. नामदेव उसेंडी यांनी आश्रमातील प्रभुजींसोबत रक्षाबंधन साजरे केले. या भावनिक क्षणी त्यांनी प्रभुजींसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घेतले.

समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू घटकांना आधार देत ‘आपणा घर आश्रम’च्या माध्यमातून सुरू असलेले सेवाकार्य हे माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे.

कोणत्याही अपेक्षेशिवाय केली जाणारी ही सेवा समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा सेवाभावी कार्यातून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होते, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या भेटीप्रसंगी महाराष्ट्राचे ज्येष्ठ भाजपा नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आमदार बंटीभाऊ भांगडिया, यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, नगरसेवक सागर निंबोरकर, अभिजीत कोरडे, नगरसेवक अक्षय हेमके, पंकज खोबे यांच्यासह गडचिरोली व चिमूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
