Friday, October 9, 2026
HomeChamorshiचामोर्शीतील साडेपाच लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांचे आवाहन; संशयिताची माहिती द्या...

चामोर्शीतील साडेपाच लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांचे आवाहन; संशयिताची माहिती द्या…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

‘शंभर रुपयांची नोट पडल्याची’ बतावणी करून रोकड लंपास; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

गडचिरोली /चामोर्शी, 09 ऑक्टोबर 2026::-

चामोर्शी येथे बँकेतून काढलेली ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड लक्ष विचलित करून लंपास केल्याच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी संशयिताचा फोटो प्रसिद्ध करून नागरिकांकडे माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बँकेतून पैसे काढून मोटारसायकलने जात असताना एका इसमाने ‘तुमची शंभर रुपयांची नोट मागे पडली आहे,’ असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. याच संधीचा फायदा घेत रोकड असलेली पिशवी चोरून संशयित आपल्या साथीदारासह मोटारसायकलवरून फरार झाला.

फोटोतील संशयित व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने चामोर्शी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयित आढळल्यास स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अनोळखी व्यक्तींकडून नोट पडल्याची किंवा अन्य कारणांची बतावणी करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच संशयिताबाबतची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे (९८२३९५०६४५) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बनसोडे (९५५२५०९६९०) यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular