Friday, October 9, 2026
HomeChamorshiवायगाव-अंबोलीसह तीन गावांच्या पाणीप्रश्नाची दखल...

वायगाव-अंबोलीसह तीन गावांच्या पाणीप्रश्नाची दखल…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नळ पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश,

गडचिरोली /चामोर्शी, 08 ऑक्टोबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील वायगाव (अंबोली), कन्हाळगाव व अंबोली या गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित उपविभागीय अभियंत्यांना पत्र देऊन योजनेची चौकशी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याबाबत आमदार मिलिंद सुगणाबाई रामजी नारोटे यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच अरुण कुकडेकर यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना वायगाव (अंबोली), कन्हाळगाव व अंबोली येथील नळ पाणीपुरवठा योजनेची मौका चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच योजनेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे गेल्या काही काळापासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा योजनेची तातडीने दुरुस्ती करून नियमित व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular