Wednesday, October 14, 2026
HomeGadchiroliनागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाची १८ ऑक्टोबरला महत्त्वपूर्ण बैठक...

नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाची १८ ऑक्टोबरला महत्त्वपूर्ण बैठक…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सुधाकर कोहळे यांच्या प्रचार नियोजनावर होणार चर्चा; पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे डॉ. देवराव होळी यांचे आवाहन,

गडचिरोली, 14 ऑक्टोबर 2026::- आगामी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी भाजपच्या अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाची पूर्व विदर्भस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत चर्चा होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजित ही बैठक सकाळी १० वाजता नागपूर येथील भाजपा कार्यालय, मंगलम बिल्डिंग, गणेश पेठ येथे पार पडणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, पूर्व विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, आमदार प्रवीण दटके आणि भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय आजी-माजी आमदार आणि खासदारही बैठकीत सहभागी होणार आहेत.

सहा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन :-

या बैठकीसाठी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष, महामंत्री, मंडळ अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीत आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित करणे, विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, संघटनात्मक यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करणे आणि निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करणे या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

पूर्व विदर्भातील अनुसूचित जमाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहून आपापली संघटनात्मक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular