VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पदवीधर मतदारांशी साधला थेट संवाद; भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन,
गडचिरोली, 11 ऑक्टोबर 2026::-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराला वेग आला असून, भाजपाचे आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांच्या विजयासाठी आवाहन केले.
डॉ. देवराव होळी यांनी पदवीधर मतदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या समर्थनार्थ पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले. सुधाकर कोहळे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी पदवीधर मतदारांनी भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचा संदेश पोहोचविण्यावर डॉ. होळी यांनी भर दिला. तसेच सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे आणि अधिकाधिक पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचावे, असेही त्यांनी सांगितले.
पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधून भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला बळ देण्याचा प्रयत्न डॉ. देवराव होळी यांनी या माध्यमातून केला.
