VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
कुरखेडा तालुक्यातील दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा; हलामी कुटुंबीयांचे दुःख जाणून घेत दिला धीर,
गडचिरोली, 15 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या कु. रानू कृष्णा हलामी या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका निरागस बालिकेचे अकाली निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून, या दुःखद प्रसंगामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोक उईके यांच्यासमवेत रानू हलामी हिच्या शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यात आली. यावेळी कुटुंबीयांचे दुःख जाणून घेत त्यांना धीर देण्यात आला. आपल्या लाडक्या मुलीला गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य असून, या कठीण प्रसंगी हलामी कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
एका चिमुकल्या जीवाचे असे अकाली निघून जाणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या दुःखद घटनेमुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. रानूच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना मानसिक आधार मिळणे महत्त्वाचे आहे.
यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, भाजपचे कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, पोलीस अधीक्षक एम. अरुण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एम. अरुण तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
