Thursday, October 15, 2026
HomeGadchiroliवाढदिवसाचा आनंद गरजूंच्या चेहऱ्यावर! सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘माणुसकीचा घास’ उपक्रमातून अन्नदान...

वाढदिवसाचा आनंद गरजूंच्या चेहऱ्यावर! सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘माणुसकीचा घास’ उपक्रमातून अन्नदान…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सलग १,३७२ दिवसांपासून अखंड सेवाकार्य; जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना अन्नदान करून जपली माणुसकी,

गडचिरोली, 15 ऑक्टोबर 2026::–स्वतःच्या आनंदात इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हाच खऱ्या माणुसकीचा धर्म आहे. समाजातील गरजू आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देत माणुसकीचे नाते जपण्याचा स्तुत्य उपक्रम म्हणजे ‘माणुसकीचा घास’ होय. या उपक्रमांतर्गत गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय सागर दादा निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालय, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे गरजूंसाठी अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाचा हा सलग १,३७२ वा दिवस ठरला.

वाढदिवस म्हटला की केक, हार-तुरे, सत्कार आणि जल्लोष असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, आपल्या आनंदाच्या क्षणी गरजूंच्या भुकेची जाणीव ठेवून त्यांना अन्नाचा घास भरविणे, ही समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेची खरी ओळख आहे. सागर दादा निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अनेकदा रुग्णसेवेत व्यस्त असताना जेवणाचीही अडचण भेडसावते. अशा गरजू व्यक्तींना अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘माणुसकीचा घास’ हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. सलग १,३७२ दिवसांपासून सुरू असलेला हा सेवायज्ञ म्हणजे केवळ अन्नदान नव्हे, तर समाजातील वंचित आणि गरजू व्यक्तींबद्दल असलेल्या आपुलकीचा प्रत्यय आहे.

“स्वार्थाच्या दुनियेत निस्वार्थ सेवेचा दीप उजळविणारे हातच समाजाला माणुसकीची खरी ओळख करून देतात,” या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधत करण्यात आलेल्या अन्नदानाचे उपस्थितांनी कौतुक केले. गरजूंना मदत करणे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलविणे आणि समाजात सेवाभावाची भावना रुजविणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या अन्नदान प्रसंगी नगरसेवक सागर दादा निंबोरकर, नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ. उसेंडी साहेब, गोविंदजी सारडा, अनिलभाऊ कुनघाडकर, सुधाकरजी येनगंधलवार, विनोद देवोजवार, घनश्यामजी वाढई, अविनाश विश्रोजवार, अजय भांडेकर, हर्षल गेडाम, गोलू नैताम, केशव मडावी, अंकित हेमके, आकाश बोलुवार, सागर सोनटक्के, रविभाऊ शुद्धलवार, शिल्पा हेमके, वर्षाताई शेडमाके, सीमा कन्नमवार, ज्ञानेश्वरी धंदरे, साक्षीताई बोलुवार, अर्चना निंबोड, सुनीता आलेवार यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘माणुसकीचा घास’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन :-

समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्नदात्यांनी ‘माणुसकीचा घास’ या सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संजय मेश्राम (मो. ९४२३४२२४०४) यांच्याशी संपर्क साधावा.

वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःचा आनंद साजरा करण्यासोबतच गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular