Tuesday, October 20, 2026
HomeChamorshiनागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी...

नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

हळदवाही–रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रात सुरेश शहा मैदानात; सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी गावोगावी मतदारांच्या भेटीगाठी,

पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन,

गडचिरोली /चामोर्शी, 20 ऑक्टोबर 2026::-नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराला हळदवाही–रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रात वेग आला आहे. भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा हळदवाही–रेगडी जिल्हा परिषद क्षेत्राचे पदवीधर प्रमुख सुरेश शहा यांनी क्षेत्रात जोरदार दौरा करीत गावोगावी मतदारांशी थेट संपर्क साधला. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

गावोगावी जनसंपर्क; मतदारांच्या भेटीगाठींवर भर:-

हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, मक्केपल्ली, माल मकेपल्ली, चेक नंबर-१, माडे, मुधोली, पावी, मुरुंडा, माडेआमगाव, रेगडी, विकासपल्ली आदी गावांमध्ये सुरेश शहा यांनी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन जनसंपर्क साधला आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना मतदान करून विजयी करण्याची विनंती केली.

पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा जनसंपर्क दौरा करण्यात आला. ग्रामीण भागातील मतदारांशी थेट संवाद साधत निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

भाजप कार्यकर्ते प्रचारासाठी सक्रिय :-

या जनसंपर्क दौऱ्यावेळी तारक हलदार, सोम वैद्य, अजय पुडो, देवनाथ भोवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले असून, मतदारांशी संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी हळदवाही–रेगडी क्षेत्रात भाजपकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू असल्याचे या दौऱ्यातून दिसून आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular