Thursday, September 17, 2026
HomeAramoriसिर्सीत रानटी हत्तीचा धुडगूस; नुकसानग्रस्त शेतांची आमदार रामदास मसराम यांच्याकडून पाहणी...

सिर्सीत रानटी हत्तीचा धुडगूस; नुकसानग्रस्त शेतांची आमदार रामदास मसराम यांच्याकडून पाहणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश; हत्तीमुळे पडलेले वीजखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला सूचना,

गडचिरोली /आरमोरी, १७ सप्टेंबर २०२६ ::-आरमोरी तालुक्यातील सिर्सी येथे रानटी हत्तीने शेतपिकांचे नुकसान केल्याची घटना समोर आली असून, या नुकसानीची आमदार रामदासजी मसराम यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी वनविभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सिर्सी परिसरात रानटी हत्तीच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार मसराम यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. वनविभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

वीजखांब पडल्याने वीजपुरवठा खंडित; तातडीने दुरुस्तीच्या सूचना :-

रानटी हत्तीमुळे परिसरातील विजेचे दोन खांब पडल्याची माहिती मिळताच आमदार मसराम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पडलेले वीजखांब तातडीने उभारून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी त्वरित दुरुस्तीची कार्यवाही करण्यावर त्यांनी भर दिला.

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा :-

रानटी हत्तीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आमदार मसराम यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान काँग्रेस कमिटीचे आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, भूपेश कोलते, वनपरिक्षेत्र अधिकारी पाचभाई, क्षेत्र सहाय्यक समर्थ, वनरक्षक वाळके, वनरक्षक दोडके, वनरक्षक आंबेडारे, कृषी सहायक आत्राम, समूह कृषी सहायक बोरकर, वनमजूर उरकडे, श्रीकांत भजभुजे, सुरेश फुकटे, रमेश मुरमुरवार, वासुदेव पेंदाम, कुमोद कुलशिंगे, विपुल वाघाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सिर्सी येथील रानटी हत्तीच्या नुकसानीची तातडीने दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular