Tuesday, November 10, 2026
HomeChamorshiदीपक धाम गौशाळेत गोवर्धन पूजेचा भक्तिमय सोहळा; माजी आमदार डॉ. देवराव होळी...

दीपक धाम गौशाळेत गोवर्धन पूजेचा भक्तिमय सोहळा; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते गौमातेचे पूजन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा दिला प्रेरणादायी संदेश,

गडचिरोली /चामोर्शी, 10 नोव्हेंबर 2026::-गोवर्धन पूजेच्या पावन पर्वानिमित्त चामोर्शी येथील दीपक धाम गौशाळेत भक्तिमय वातावरणात गोवर्धन पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते गौमातेचे विधिवत पूजन करून धार्मिक परंपरेचे पालन करण्यात आले.

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अत्यंत पूजनीय स्थान आहे. गोसेवा ही केवळ धार्मिक श्रद्धा नसून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गोमातेचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी डॉ. देवराव होळी यांनी दिला.

यावेळी त्यांनी गौशाळेतील गोमातांचे दर्शन घेतले तसेच गौशाळेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गोसेवेच्या कार्याचे कौतुक केले. गोमातेची सेवा आणि संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या धार्मिक सोहळ्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, उमेशजी कुकडे, देवेंद्रजी दुधबळे, प्रज्वल सोमनकर, विशाल सोमनकर, वैभव सोमनकर, प्रियंका पवार, यशवंत सोमनकर, साईनाथ लटारे, नारायण पाटील नैताम, रामदासजी गोवारी, अशोकजी लटारे, चेतन चापले, दीपक राऊत आदी मान्यवर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

गोवर्धन पूजेच्या निमित्ताने दीपक धाम गौशाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गोमातेच्या पूजनातून गोसेवा आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा संदेश देत हा सोहळा उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular